22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयदुबईहून सोन्याची तस्करी

दुबईहून सोन्याची तस्करी

पुणे : दुबईवरून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले. सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सला (डीआरआय) मिळाली होती. त्यानुसार पथकाने विमानतळावर सापळा लावला होता.

विमानतळावर आल्यानंतर महिला पोलिसांना गडबडीत दिसली. तर कारवार्इ होणार असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्याबरोबर असलेला साथीदार विमानतळातून बाहेर पडण्याचा प्रयत्नात होते. डीआरआयच्या पथकाने दोघांची संशयावरून चौकशी सुरू केली.

दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सोने आढळून आले. त्यानुसार महिलेसह तिच्याबरोबर असलेल्या अटक करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध भारतीय सीमाशुल्क कायद्यान्वये (कस्टम ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांची न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. चार दिवसांपूर्वी कस्टमच्या पथकाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ७३ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR