पुणे : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्ष कामाला लागला असून स्थानिक पातळीवर सर्व स्तरांतील कार्यकर्ते जोमाने तयारी करताना दिसून आले आहेत. अशातच आता उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.
त्यात पुढेही शक्तिप्रदर्शन, सभांच्या नियोजनासाठी सर्वांत जास्त लागतात त्या खाजगी गाड्या. त्यामुळेच खाजगी गाडीचालकांना सध्या अच्छे दिन आले आहेत.
या दरम्यानच्या काळात पुढचा महिनाभर खाजगी गाड्या नेत्यांकडून बुक करण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त माणसे, समर्थक बसवून आणण्यासाठी मोठ्या गाड्यांना पसंती दिली जातेय. ज्यात स्कॉर्पिओ, क्रूझर, इर्टिगा, इनोव्हा इत्यादी गाड्यांना जास्त मागणी आहे. त्यातच गाड्या कमी असल्याने या खाजगी वाहनचालकांनी दर वाढवले आहेत.
निवडणुकीत वाढले गाड्यांचे भाडेदर
स्कॉर्पिओ, क्रुझर, इर्टिगा, इनोव्हा, सोबत प्रचारासाठी अशा गाड्यांचे प्रतिकिलोमीटरप्रमाणे दर वाढले आहेत.