सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यांतून सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्यहातभट्टी दारू विक्री केली जाते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने १५ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये अवैध हातभट्टी दारू, देशी-विदेशी मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच अवैध मद्य विक्री करणाऱ्या डांब्यावर केलेल्या कारवाईत एक कोटी ७७ लाख ७१ हजार ४१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक,आंध्र प्रदेश यासह विविध राज्यांतून बनावट, देशी-विदेशी दारूची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व ठिकाणी नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली. अवैध मद्य विक्री करणान्या १४ वाल्यांवर ही कारवाई करून ३७३ गुन्हे दाखल केले. ३५९ जणांवरही कारवाई केली. या कारवाईत एक लाख ११ हजार ५८० लीटर गुळमिश्रीत रसायन, ९ हजार ५२९ लीटर हातभट्टी दारू१ हजार ८७१ लीटर ताडी, १ हजार ७७५ लीटर देशी दारू८२६ लिटर विदेशी मद्य, बनावट विदेशी मद्य ८७ लीटर२८३ बिअर७३ बाहनासह एकुण एक कोटी ७७ लाख ७९ हजार ४१९ इतका मुद्देमाल जप्त केला.
अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या मातोश्री ढाबा, दुर्गा ढाबा होटगी रोड, जयभवानी ढाबा मंगळवेढा रोड, सावजी कोल्ड्रींक्स, कन्ना चौक तसेच पंढरपूर कासेगाव येथील साईराजे, महाराजा ढाबा तारापूर माढा येथील राणा ढाबा,माळशिरस येथील सावन ढाबा, शिवनेरी टाकळी सिंकदर ता. मोहोळ, हॉटेल सावली भोगाव ता. उत्तर सोलापूर, शुभम ढाबा सांगोला ता. सांगोला, बेलाटी येथील जय भवानी ढाबा या १४ ढाब्यांवर कारवाई केली. ब्रॉथ अॅनलायझरचा वापर करून वैद्यकीय चाचणी नंतर १४ ढाबा मालक व ३५ मद्यपी ग्राहकांना न्यायालयासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी २५ हजार रूपये, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी तीन हजार रुपये इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा दिली. चार लाख ३० हजार रुपये दंड जमा केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. एम. चवरे, जे. एन. पाटील, अ. व्ही. घाटगे, पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक एस. डी. कांबळे, आर. एम. कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सिद, अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, वाहनचालक रशीद शेख, दीपक वाघमारे यांनी ही कारवाई पार पडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने निवडणुकीच्या काळात मोठी कारवाई केली. पावणे दोन कोटीचा दंड वसूल केला. यापुढेही कारवाई सुरू राहील, परवाना नसणाऱ्या ठिकाणी मद्य प्रशान केल्याने संबंधित जागा मालक व मद्यपींवर कारवाई होईल. अवैध दारू विक्री, वाहतूक होत असल्यास उत्पादन विभागाशी संपर्क साधावा असे राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगीतले.