25.5 C
Latur
Tuesday, June 3, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचाच फोटो गायब

महायुतीच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचाच फोटो गायब

आयोजकांवर बॅनर बदलण्याची नामुष्की

बीड : राज्यभरात आज महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले असून, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते या मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. परंतु, बीड शहरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या बॅनरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचाच फोटो नसल्याचे पाहायला मिळाले. यावरून शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी भाजपवर टीका केली होती. याचवेळी गोपीनाथ मुंडे यांचा बॅनरवर फोटो नसल्याची बाब भाजप कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली आणि अखेर महायुतीच्या नेत्यांवर बॅनर बदलण्याची नामुष्की आली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर तीनही पक्षाच्या नेत्यांची फोटो लावण्यात आली आहेत. मात्र, बीडच्या महायुती मेळाव्याच्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचाच फोटो नव्हता. यावरून भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आयोजकांनी तात्काळ बॅनर बदलून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असलेला बॅनर लावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR