नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधना आहे. आवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त असून पंचनामे न करणारे सरकार सुस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, खोके सरकार जनतेशी खोटे बोलत आहे. शेतकऱ्यांना मदत करायची आहे की नाही ते सरकारने स्पष्ट केले पाहिजे, हिवाळी अधिवेशनाचा कालावधीही कमी आहे, जनतेच्या प्रश्नावर सरकार अजिबात गंभीर नाही.
तसेच नवाब मलिक यांच्याबाबत बोलताना नाना म्हणाले की, भाजपला भ्रष्टाचारी गुन्हेगारांशी संबंधित लोक चालतात मग मलिक का चाकात नाहीत, असा खोचक टोला त्यांनी लगावला. नाना पटोले यांनी आरोप केला की, नवाब मलिक मु्स्लीम आहेत म्हणून त्यांना टार्गेट केले जात आहे. एकीकडे भाजप राष्ट्रप्रेमाची गोष्ट करते आणि त्यांना भ्रष्टाचारी, गुन्हेगारीशी संबंधित लोक चालतात, मग नवाब मलिक का चालत नाहीत. ही भाजपची नौंटकी आहे, असा घणाघात नाना पटोलेंनी केला.
ऑनलाईन फ्रॉड विषयी नाना म्हणाले की, ऑनलाईन फ्रॉड अँप तसेच वाढीव व्याजाला बळी पडून तसेच काही बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोटाळे होत आहे, या सर्वाला कंटाळून लोक आत्महत्या करत आहेत, लोकांची घरे उध्वस्त होत आहेत, सरकारकडे हे घोटाळे थांबवण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही, हे दुर्दैवी आहे. ही व्यवस्था बदलली पाहिजे, असे ते म्हणाले.