17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे समितीच्या अहवालावर जीआर निघणार

शिंदे समितीच्या अहवालावर जीआर निघणार

मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती कुणबी दाखले मिळवतानाच्या अडचणी कमी होणार

मुंबई : मराठा समाजाला कुणबी दाखले मिळवताना अनेक अडचणी येत होत्या, या अडचणी आता कमी होणार आहेत, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. शिंदे समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या ताज्या अहवालावर सह्याद्री अतिथीगृह इथे पाच तास बैठक पार पडली. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शिंदे समितीच्या अहवालात त्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यातला सोपेपणा कसा निर्माण करता येईल? अशा प्रकारच्या काही सूचना केल्या आहेत. त्या मंत्रिमंडळाने मान्य केल्या आहेत, त्यावर आता जीआर निघेल. समितीने टप्प्याटप्यावर खूप गोष्टी सोप्या केल्या आहेत. जसे की यापूर्वी १० पुराव्यांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळायचे पण आता ही पुराव्यांची संख्याच ४२ करुन टाकली आहे.

हे ४२ पुरावे समितीने वेबसाईटवर टाकून दिले आहेत. यामध्ये जेलमधील नोंदी, पोलिस स्टेशनमधील नोंदींचा समावेश आहे. यातून सर्वसाधारण मराठा व्यक्ती देखील आता वेबसाईटवरील या नोंदी बघून यातील कुठला पुरावा आपल्याकडं सापडतोय का? हे बघू शकतो. यापूर्वी १० पुराव्यांमध्ये ती सापडत नव्हती पण आता ४२ पुराव्यांमध्ये ती सापडते. त्यामुळे आता मराठा समाज धावतपळत जाऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकतो.

हैदराबाद, सातारा किंवा त्र्यंबकेश्वर गॅझेटमध्ये किंवा कुठल्याही गॅझेटमधील नोंदी या एक गठ्ठा आहेत. त्यामुळे अशा एक गठ्ठा नोंदी असल्याने अशा समुहाला तुम्हाला कन्व्हर्ट करता येत नाही. म्हणजेच मराठा ते कुणबी असा बदल करता येत नाही. १८८२ मध्ये मराठा समाज जर कुणबी होता पण १९९२ पासून तो पुन्हा मराठा असे लिहायला लागला. त्यावेळी काही चळवळी झाल्या त्यानंतर कुणबी या नोंदी मराठा अशा झाल्या. त्यानंतर पुढे मराठा अशाच लावल्या गेल्या.

‘त्यांनाच’ कुणबी प्रमाणपत्रे मिळणार
सन १८९२ पासूनची वैयक्तिक कुणबी अशी नोंद ज्यांची सापडते आहे. त्यांना तात्काळ प्रमाणपत्रे देण्यात येतील असेही चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितले. तसेच शिंदे संमितीच्या स्थापनेनंतर आतापर्यंत १ लाख ७६ कुणबी नोंदी सापडल्या आहेत असेही यावेळी चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले.

अहवालात काय माहिती नाही : जरांगे
निवृत्त न्यामूर्ती संदीप शिंदे समितीने जो अहवाल सादर केला आहे. तो सरकारने काही ओपन केलेला नाही. त्यामुळे त्या अहवालामध्ये काय आहे हे आपण सांगू शकत नाही. शिंदे समिती ही नोंदी तपासण्यासाठी आहे. मराठा समाज कुणबी कसा आहे, मराठा कुणबी एकच आहे, हैदराबाद गॅजेटमध्ये राज्यातील मराठा समाजाबद्दलचे असणारे अनेक पुरावे आहेत, राज्यातील जनगणना १८८४ च्या अगोदरचे गॅजेट या सर्वांचा सर्वच विषयांचा हा अहवाल असण्याची शक्यता आहे. ८३ व्या क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच आहे. यावर शिंदे समितीने काम केलेले असेल तरच त्या समितीचा उपयोग असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR