बार्शी: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्राभिमान व तिरंग्याप्रती असलेला सन्मान जागवण्यासाठी बार्शी शहरात हर घर तिरंगा अभियानांतर्गत भारतीय जनता युवा मोर्चातर्फे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. संपन्न झाली. तिरंग्याप्रती अभिमान व राष्ट्रभक्तीची भावना जागवणाऱ्या या तिरंगा रॅलीला बार्शीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिरंगा रॅलीची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी येथून झाली तर सांगता शहीद स्मारक येथे झाली.
यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरम् च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. तिरंगा रॅलीमध्ये भाजपा जिल्हा युवा मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष एडवोकेट रणवीर राजेंद्र राऊत, माजी सरपंच दीपक रोंगे, माजी जि.प. सदस्य मदन दराडे (सर) यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, बार्शी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
















