मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक ४ वर्षांच्या संसारानंतर हार्दिक-नताशाचा घटस्फोट
मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी मॉडेल नताशा स्टँकोविच यांचा घटस्फोट होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज हार्दिक आणि नताशा दोघांनीही घटस्फोटाची घोषणा करून या चर्चांना पूर्णविराम दिला. आमचा ४ वर्षांचा संसार होता. आम्ही या काळात अनेक चांगले क्षण जगलो. आम्ही जरी वेगळे होत असलो तरीही आमचा मुलगा अगस्त्य याला आम्ही आई-वडीलांचे प्रेम कमी पडू देणार नाही. आम्ही दोघेही त्याची काळजी घेऊ, अशा आशयाची पोस्ट लिहीत या जोडीने घटस्फोट घेतल्याचे स्पष्ट केले.
पोस्ट शेअर करत हार्दिकने लिहिले चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हे नाते वाचवण्यासाठी सर्व काही दिले. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास घेत आम्ही एक कुटुंब म्हणून वाटचाल केली.
मुलगा अगस्त्य याच्याबद्दलही त्यांनी लिहिले मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात अगस्त्य आहे, जो नेहमी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असेल. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्याला जगातील सर्व सुख मिळावे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्याच्या आनंदासाठी जे काही करता येईल ते करू. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात आमची गोपनीयता तुम्ही समजून घ्याल.
पांड्या आणि त्याची पत्नी मॉडेल नताशा स्टँकोविच यांचा घटस्फोट होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज हार्दिक आणि नताशा दोघांनीही घटस्फोटाची घोषणा करून या चर्चांना पूर्णविराम दिला. आमचा ४ वर्षांचा संसार होता. आम्ही या काळात अनेक चांगले क्षण जगलो. आम्ही जरी वेगळे होत असलो तरीही आमचा मुलगा अगस्त्य याला आम्ही आई-वडीलांचे प्रेम कमी पडू देणार नाही. आम्ही दोघेही त्याची काळजी घेऊ, अशा आशयाची पोस्ट लिहीत या जोडीने घटस्फोट घेतल्याचे स्पष्ट केले.