नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हार्दिक पांड्या आणि नताशाचा मुलगा अगस्त्य याचा आज वाढदिवस आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तो आपल्या मुलासोबत मस्ती करत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये हार्दिकने लिहिले की, तू मला दररोज पुढे जाण्याची प्रेरणा देतो. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे शब्दांमधून व्यक्त करता येणार नाही, असेही हार्दिक पांड्या पोस्टद्वारे म्हणाला.
दरम्यान, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
१८ जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. आयपीएलच्या वेळेपासूनच दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, घटस्फोटाच्या पोस्टमध्ये दोघांनीही आपल्या मुलाचे अगस्त्याचे सहपालक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.