24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयजो पेरू शकतो, वाढवू शकतो...तो उपटून फेकूही शकतो

जो पेरू शकतो, वाढवू शकतो…तो उपटून फेकूही शकतो

नवी दिल्ली : पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी अनेक संघटनांच्या नेतृत्वाखाली आजपासून चलो दिल्लीचा नारा देत आंदोलन सुरू केले आहे. आज दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. शंभू सीमेवर शेतकरी आंदोलकांची मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

हरियाणा आणि पंजाबमधील शंभू सीमेवरील शेतकरी दिल्लीकडे जाण्यासाठी ठाम आहेत. दरम्यान, पोलिसांनी शेतक-यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या असून त्यानंतर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतक-यांना २०० मीटरपर्यंत मागे ढकलण्यात आले. मशिनचा वापर करून सिमेंटचे बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर आरएएफ तैनात करण्यात आले आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी याचपार्श्वभूमीवर ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘जय जवान, जय किसान हा आपल्या देशाचा नारा होता, आज मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आपले जवान व किसान एकमेकांच्या समोर शस्त्र घेऊन उभे आहेत. स्वत:च्या देशातील नागरिकांना एकमेकांच्या विरोधात झुंजवत ठेवणे हेच केंद्र सरकारचे प्राथमिक धोरण दिसते अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.

आमच्या शेतक-यांना दिवसा वीज पुरवठा द्या, आमच्या शेतक-यांना हमीभाव द्या, त्यांच्या शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारात नेण्यासाठी मार्ग खुला करा, बळीराजाचे बिबट्यासारख्या ंिहस्र प्राण्यांपासून रक्षण करा.. अशा शेतकरी हिताच्या मागण्या कित्येकदा संसदेत मांडल्या आहेत, यावर केंद्रातील भाजपा सरकारने अवाक्षरही काढले नाही. साध्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चालढकल करणा-या सरकारने शेतक-यांना रोखण्यासाठी मात्र तातडीने सीमेवरील सैन्य हलवून शेतक-यांच्या समोर आणून ठेवले, बळीराजाच्या वाटेत खिळे ठोकले, शेतक-यांवर अश्रुधुराचा माराही सुरू केला. कृषीप्रधान देशातील शेतक-यांवर बंदूक रोखण्याचे पाप या सरकारने केले आहे. याची किंमत सरकारला चुकवावीच लागेल, जो पेरू शकतो, वाढवू शकतो… तो उपटून फेकूही शकतो हे सरकारने ध्यानात ठेवावे, असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR