आषाढी वारीत वारक-यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग सज्ज

पंढरपूर : प्रतिनिधी
आषाढी वारी काळात पंढरपूर इथे यावर्षी आरोग्य विभागाच्या वतीने गंभीर रुग्णांसाठी प्रथमच एअर ऍम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गावर २१५ बाईक ऍम्ब्युलन्स ची सुविधाही उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

वास्तविक, २५ जुलै रोजी होणा-या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या अनुषंगाने कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी (४ जुलै) आढावा बैठक घेतली. आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासह लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. पालखी मार्गासह पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने भाविकांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

यात्रेदरम्यान सुसज्ज रुग्णवाहिका आणि बाईक ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, यंदापासून अत्यावश्यक रुग्णांसाठी प्रथमच एअर ऍम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

आषाढी यात्रेत वारक-यांसाठी ३५३ रुग्णवाहिका आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्ग व मुक्कामस्थळी वारकरी भाविकांना पुरविण्यात येणा-या आरोग्य सुविधांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, वारकरी घरातून वारीसाठी निघाल्यापासून ते सुखरूप घरी परतेपर्यंत आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारी कालावधीत ‘आरोग्यसंपन्न वारी’ आणि ‘वारी सहाय्य’ या उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर वारक-यांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकेमार्फत आवश्यक माहिती व मदत पुरविण्यात येईल.

यंदाच्या यात्रेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार असून, अत्यावश्यक रुग्णांसाठी प्रथमच एअर ऍम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दिंडी प्रमुखांना प्राथमिक उपचार कीटचे वाटप करण्यात येणार आहे. वारक-यांच्या सेवेसाठी ३ हजार ८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, फिरते आरोग्य पथक आणि ३०२ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत राहणार आहेत.

बैठकीनंतर मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. रुग्णालयातील स्वच्छतेची पाहणी केली, रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणा-या उपचारांची माहिती घेतली आणि संबंधित अधिका-यांना आवश्यक सूचना दिल्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news