17.6 C
Latur
Thursday, November 27, 2025
Homeराष्ट्रीयकर्नाटकात मुख्यमंत्री बदलावरून जोरदार लॉबिंग

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलावरून जोरदार लॉबिंग

जारकीहोळींची भेट, सिद्धरामय्यांचे लॉबिंग सुरू

बंगळूरू : महाराष्ट्राचे शेजारी राज्य कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वातील एक गट अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युलाची आठवण करून देत जोरदार लॉबिंग सुरू केलं आहे. दिल्लीतूनही या नेतृत्वबदलाबाबत गांभिर्यानं विचार होत आहे. डीके शिवकुमार आणि त्यांच्या गटातील नेते दिल्लीत आपला तळ ठोकून आहेत. ते काँग्रेस हाय कमांडवर निर्णय घेण्यासाठी दबाव देखील टाकत आहेत.

एकीकडे डीके शिवकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार अशी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देखील आपली खुर्ची वाचवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. त्यांनी आपल्या जवळच्या नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. त्यात गृहमंत्री जी परमेश्वरा, सतीश जारकीहोळी आणि इतर नेत्यांचा देखील समावेश आहे.

काँग्रेस चर्चा करणार : खर्गे
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीवर मोठे वक्तव्य केले. त्यांनी आम्ही सर्वांना बोलवून चर्चा करू, या चर्चेत राहुल गांधी देखील उपस्थित राहणार आहेत. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. खर्गेंनी आम्ही सर्व एक टीम असून मी एकटा नाही. पार्टी हाय कमांडची टीम चर्चा करून निर्णय घेईल.

डीके दिल्लीत तंबू ठोकून
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या डीके शिवकुमार आणि त्यांच्या समर्थक गटानं दिल्लीत आपला तंबू ठोकला आहे. ते काँग्रेस नेतृत्वावर जबाव निर्माण करत आहेत. डीके शिवकुमार गटाचे नेते पक्षाने लवकर निर्णय घेऊन स्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करत आहेत. डीके शिवकुमार हे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी त्यांना वाट पाहण्याचा संदेश दिला आहे. त्यानंतर डीके शिवकुमार हे आता सोनिया गांधी यांच्याकडे जाणार असून ते २९ नोव्हेंबरला सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीत जाऊ शकतात.

सिद्धरामय्या देखील तयारीत
कर्नाटकमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत सीएम सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री निवासस्थानावर जवळच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री जी परमेश्वरा, सतीश जारकीहोळी आणि महादेवप्पा, व्यंकटेश यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. आमदार राजन्ना यांचा देखील यात समावेश होता.

सतीश जारकीहोळींशी चर्चा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सतीश जारकीहोळी यांच्याशी ब्रेकफास्ट मिटिंग आयोजित केली होती. या बैठकीला बीके हरिप्रसाद, महादेवप्पा यांचा देखील समावेश होता. या बैठकीनंतर सतीश जारकीहोळी आणि सिद्धरामय्या हे आपल्या सहयोगी मंर्त्यांसोबत मुख्यमंत्री कार्यालयातून बाहेर पडले. यापूर्वी डीके शिवकुमार देखील जारकीहोळींना भेटले असून त्यांनी जारकीहोळींना उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देऊ केल्याची चर्चा रंगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR