16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मुंबई : उत्तर केरळपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरु आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्राकार परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मुसळधार पाऊस पडत असून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम आहे.

सतत दोन तीन दिवस अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल तातडीने शासनास सादर करावा असे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नुकसानीचे पंचनामे करत असताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात २ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

प्राथमिक आकडेवारीत अमरावती जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. अमरावतीत कापूस, तुरी आणि संत्र्याच मोठे नुकसान झाले आहे. परंतु शासनाच्या नजरेत अमरावती जिल्ह्यात नुकसानच झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसामुळे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले होते.

नुकसानाची आकडेवारी शासनाकडून जाहीर
राज्यात २६ ते २८ पर्यंत झालेल्या अवकाळी पावसात २२ जिल्ह्यांतील नुकसानाची प्राथमिक आकडेवारी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. परंतु अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या यादीत अमरावती जिल्हा वगळला गेला आहे. अमरावती जिल्ह्यात नुकसान झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

दर वाढण्याची शक्यता
अवकाळी पावसामुळे दर वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे मुंबईच्या बाजार समितीत येणाऱ्या लाल मिरचीचे आगमन आता लांबणीवर पडल्यामुळे घरोघरी वर्षभरासाठी मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीची टंचाई भासणार आहे. वाशीतील घाऊक मसाला बाजारात दिवाळीनंतर मसाल्याच्या मिरचीची आवक सुरू होते.

शेतकऱ्यांना दगा देणारे सरकार
शेकडो कोटी खर्च करून “शासन आपल्या दारी” म्हणत जाहिरातबाजी करणारे सरकार आज शेतकरी हवालदिल झाले असताना साधे ढुंकून ही पाहायला तयार नाही. तसेच शेतकऱ्यांनाही दगा देणारे सरकार राज्यात आहे हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR