एव्हरेस्टच्या उंचीवर झेपावणारे हेलिकॉप्टर आता भारतात बनणार

मुंबई : भारताच्या संरक्षण सिद्धतेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ‘लोकभवन’ येथे महत्त्वाची भेट झाली. दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे टाटा-एअरबस एच-१२५ हेलिकॉप्टर असेंब्ली लाईनचे ऑनलाइन उद्घाटन केले.

मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी सांगितले की भारत आणि फ्रान्स भारतात संयुक्तपणे असे हेलिकॉप्टर तयार करतील जे माउंट एव्हरेस्टइतक्या उंचीवर उडू शकतील. मोदींनी फ्रान्सला भारताचा विशेष भागीदार म्हणून वर्णन केले आणि दोन्ही देशांनी त्यांचे संबंध विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी पातळीवर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी म्हणजे दोन्ही देश व्यापार किंवा शस्त्रास्त्र व्यापारापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर सुरक्षा, तंत्रज्ञान, अवकाश, सागरी सुरक्षा आणि प्रमुख जागतिक मुद्यांवर एकत्र काम करतील. यापूर्वी, दोन्ही देशांमधील संबंध सामरिक भागीदारी पातळीवर होते. ही भागीदारी १९९८ मध्ये सुरू झाली. मॅक्रॉन म्हणाले की भारत एक विश्वासार्ह भागीदार आहे आणि फ्रान्स भारतासोबत तंत्रज्ञान सामायिक करण्यावर विश्वास ठेवतो.

इतिहासातील सर्वांत मोठा करार : पंतप्रधान मोदी
भारत-फ्रान्स भागीदारी ही केवळ धोरणात्मक नाही तर स्थिरता आणि जागतिक प्रगतीची भागीदारी आहे. २०२६ हा भारत-युरोप संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही युरोपियन युनियनसोबत इतिहासातील सर्वात मोठा व्यापार करार केला. हा करार फ्रान्ससोबतचे आमचे संबंध देखील पुढे नेईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

भारतासोबतच्या देवाणघेवाणावर विश्वास : मॅक्रॉन
भारतासोबत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यावर विश्वास ठेवतात. फ्रान्स भारतासाठी एक विश्वासार्ह भागीदार बनू इच्छितो. फ्रान्स भारतासोबत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यावर विश्वास ठेवत असल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले. मॅक्रॉन असेही म्हणाले की फ्रान्स धोरणात्मक स्वायत्ततेवर विश्वास ठेवतो, म्हणजेच स्वत:चे निर्णय घेण्यावर आणि स्वतंत्र धोरणांचा अवलंब करण्यावर.

भारताला मिळणार २४ सुपर राफेल
भारत आणि फ्रान्समधील राफेल करारातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी २४ विमाने ‘सुपर राफेल’ असतील. या प्रगत जेट विमानांना एफ-५ आवृत्ती म्हटले जात आहे, जी फ्रान्सची कंपनी दसॉ एव्हिएशन बनवत आहे. सध्या भारतीय हवाई दलाकडे जी राफेल विमाने आहेत, ती एफ-३ प्रकारची आहेत आणि त्यांना ४.५ जनरेशनची लढाऊ विमाने मानले जाते. यात स्टेल्थ वैशिष्टये आणि अणुबॉम्ब वाहून नेण्याची क्षमता देखील आहे. नवीन करारामध्ये मिळणारी बहुतेक जेट विमाने एफ-४ आवृत्तीची असतील, जी अधिक प्रगत प्रणाली आणि अद्ययावित तंत्रज्ञानासह येतील.

राफेल आता ‘मेक इन इंडिया’
मॅक्रॉन यांच्या भारत दौ-याच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्रालयाने ११४ राफेल फायटर जेट्सच्या निर्मितीला मंजुरी दिली होती. फ्रान्सची प्रसिद्ध ‘दसॉल्ट’ कंपनी आता भारतातील एका स्वदेशी कंपनीसोबत मिळून राफेलचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पामुळे भारत केवळ राफेलची निर्मितीच करणार नाही, तर भविष्यात आशियाई देशांनाही येथून या विमानांची निर्यात केली जाणार आहे.

भारत-फ्रान्स दहशतवाद संपवण्यासाठी एकत्र
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्स दोघेही लोकशाही, कायद्याचे राज्य आणि अशा जगात विश्वास ठेवतात जिथे अनेक शक्ती एकत्रितपणे संतुलन राखण्यासाठी काम करतात. ते म्हणाले की, दोन्ही देशांचा असा विश्वास आहे की जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, तरच जगातील प्रमुख समस्या सोडवता येतील.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28

Latest news