28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीय‘नमस्कार फ्रॉम स्पेस...’

‘नमस्कार फ्रॉम स्पेस…’

न्यूयॉर्क : भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी काल आपल्या टीमसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे उड्डाण घेतली. त्यांचे यान वेगाने करर कडे झेपावत आहे. दरम्यान, ऍक्सिओम स्पेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये शुभांशू यांनी त्यांच्या अंतराळ प्रवासाच्या रोमांचक अनुभवाचे वर्णन केले.

व्हीडीओमध्ये शुभांशू म्हणतात, नमस्कार फ्रॉम स्पेस. मला खूप अभिमान वाटतोय. माझ्या खांद्यावरचा तिरंगा सांगत होता की, सर्व देशवासी माझ्यासोबत आहेत. भारताच्या मानवी अंतराळ उड्डाणासाठी हे एक मोठे पाऊल आहे. अंतराळ प्रवास हा माझ्यासाठी स्वप्नासारखा अनुभव आहे. प्रक्षेपणानंतर जेव्हा मी पृथ्वी पाहिली, तेव्हा असे वाटले की, जणू एखाद्या चित्रकाराने निळे आणि हिरवे रंग मिसळून कॅनव्हास बनवला आहे. ड्रॅगन अंतराळयान प्रक्षेपणानंतर १० मिनिटांनी रॉकेटपासून वेगळे झाले, तेव्हा मला खिडकीतून सूर्याची चमक आणि तारे दिसले. माझ्यासाठी ते अविश्वसनीय होते. हा माझा प्रवास नाही, तर भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. माझ्याद्वारे तुम्हीही या प्रवासाचा पुरेपूर आनंद घ्या.

मोहिमेत कुणाचा समावेश?
ऍक्सिओम-४ मोहिमेत शुभांशू यांचा पायलट म्हणून समावेश आहे. त्यांच्यासोबत क्रूमध्ये कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), स्लावोश उजनांस्की-विश्निव्स्की (पोलंड) आणि टिबोर कापू (हंगेरी) यांचा समावेश आहे.

सध्याची स्थिती
हे ड्रॅगन यान २८,००० किमी/तास वेगाने ४१८ किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहे. यान सध्या आयएसएसपासून ४०० मीटर अंतरावर असून, भारतीय वेळेनुसार दुपारी ४:३० वाजता डॉकिंगसाठी सज्ज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR