17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeअंतरराष्ट्रीयनिज्जर प्रकरणात कॅनडाची मदत करा

निज्जर प्रकरणात कॅनडाची मदत करा

वॉशिंग्टन : खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात भारताने कॅनडाला तपासात सहकार्य करावे, असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ंिब्लकन यांनी केले आहे. भारताने आपल्या तपासात कॅनडासोबत काम करून सहकार्यात्मक पद्धतीने आपसातील मतभेद दूर करावेत, असे आम्हाला वाटते असे ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन म्हणाले, भारत आणि कॅनडा हे दोन आमचे सर्वात जवळचे मित्र आणि भागीदार आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे वाद अथवा मतभेत दूर करावेत, असे अम्हाला वाटते. एवढेच नाही, तर यासंदर्भात आपण भारतीय परराष्ट्रमंर्त्यांसोबतही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. ंिब्लकन आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन ‘२+२’ बैठकीसाठी भारतात आले होते.

आम्ही सर्व भागीदार मित्रांसोबत बोलत आहोत
एका वेगळ्या मीडिया ब्रींिफगदरम्यान परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, भारताने कॅनडातील खलिस्तानी समर्थकांच्या वाढत्या कारवायांचे गांभीर्य अमेरिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे. क्वात्रा म्हणाले, कॅनडासंदर्भात बोलायचे झाल्यास, आम्ही आमच्या सर्व मित्र आणि भागीदारांशी संवाद साधत आहोत. या विषयावरील आपली भूमिका आम्ही सविस्तर मांडली आणि स्पष्ट केली आहे.

भारताने पन्नूकडे लक्ष वेधले
क्वात्रा म्हणाले, आपल्या भागिदारांसोबत चर्चा सुरूच आहे. नुकताच पन्नूचा एक व्हीडीओसमोर आला होता. जो भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंतित करणारा होता. पन्नूने नुकताच एक व्हीडीओ जारी करत, १९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या फ्लाइटने यात्रा करू नका, असे केल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी धमकी दिली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR