28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडामोहम्मद शमीकडून अपघातग्रस्तांची मदत

मोहम्मद शमीकडून अपघातग्रस्तांची मदत

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी याने ख-या आयुष्यातील हिरोचे काम करून दाखवले आहे. अपघातातील लोकांच्या मदतीसाठी शमी देवदूतासारखा धावून गेला आहे. शमीने स्वत:च या घटनेचा व्हीडीओ शेअर करून या संदर्भातील माहिती दिली आहे.

त्याच्या या कृतीमुळे त्याचे कौतुक होत आहे. शमी उत्तराखंडच्या नैनीतालकडे निघाला होता. वाटेमध्ये त्याला अपघात झालेली गाडी दिसली. यावेळी शमीने आपली कार थांबवत आपल्या मित्राच्या मदतीने अपघातग्रस्त गाडीतील लोकांची मदत केली. त्यांची गाडी दरीमध्ये गेली होती. यावेळी त्यांना बाहेर काढण्याचे काम शमी आणि त्याच्या मित्रांनी केले. व्हीडीओमध्ये शमी जखमींना फर्स्ट एड मदत देतानाही दिसत आहे. व्हीडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.

शमीने ३१ सेकंदाचा व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओमध्ये एक गाडी दरीमध्ये गेल्याचे दिसत असून शमी अपघातग्रस्त लोकांची मदत करत आहे. शमी व्हीडीओच्या कॅप्शनमध्ये म्हणाला की, कोणाला तरी वाचवल्याचा मला खूप आनंद होत आहे. मला कोणाची तरी मदत केल्याचे समाधान आहे. दरम्यान, वर्ल्डकपमधील मोहम्मद शमीची कामगिरी उल्लेखनीय होती. त्याने वर्ल्डकपमध्ये २४ विकेट्स घेतल्या. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो गोलंदाज ठरला. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शमीने पहिली विकेट घेऊन सामन्यात उत्साह आणला होता. मात्र, भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR