23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeसोलापूरसोलापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन

सोलापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन

सोलापूर – पॅलेस्टाईन येथील हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर अत्यंत भीषण हल्ला करून 1400 हून अधिक लोकांची निर्घृण हत्या केली. शेकडो महिलांवर बलात्कार करण्यासह लहान-कोवळ्या मुलांचाही शिरच्छेद केला. अशा राक्षसी हमास ला तात्काळ आतंकवादी संघटना घोषित करावे आणि हमास , तसेच तिला पोसणार्‍या पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणार्‍यांवर आणि आंदोलने करणार्‍यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे यांनी केली.

जिल्हापरिषद, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पूनम गेट) या ठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ढगे, हिंदु जनजागृती समितीचे . किशोर जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मिनेश पुजारे यांनी केले. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनातील मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार उत्कर्ष देवकुळे यांनी स्वीकारले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR