21.3 C
Latur
Tuesday, September 17, 2024
Homeधाराशिवधाराशिव येथे दोन दुचाकीच्या धडकेत एक ठार

धाराशिव येथे दोन दुचाकीच्या धडकेत एक ठार

धाराशिव : प्रतिनिधी
दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात धाराशिव तालुक्यातील उपळा (मा) येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात धाराशिव शहरातील हनुमान चौकाजवळ ५ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास झाला. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुासर, उपळा (मा.) येथील मनोज सुरेश घोगरे (वय ४५) हे दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी हनुमान चौकाजवळ धाराशिव येथे आली असताना समोरून येणारा दुचाकीस्वार मनोज घोगरे यांच्या दुचाकीवर येवून धडकला. दुचाकीस्वाराने त्याची दुचाकी निष्काळजीपणे व भरघाव वेगात चालवून ट्रॅक्टरला ओव्हरटेक करीत असताना हा अपघात झाला. या अपघातात मनोज घोगरे हे गंभीर जखमी होवून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी मुकेश दिगंबर नवले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २७९, ३०४ (अ) सह मो. वा. कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR