34.2 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeक्रीडारोहन बोपन्नाने रचला इतिहास

रोहन बोपन्नाने रचला इतिहास

मेलबर्न : रोहन बोपन्ना आणि त्याचा पार्टनर मॅथ्यूज एब्डनने ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांनी इटालियन जोडी सिमोने आणि अँड्रियाचा ७-६ (७-०), ७-५ असा पराभव केला. बोपन्नाने वयाच्या ४३ व्या वर्षी पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. यापूर्वी बोपन्ना हा यूएस ओपनमध्ये दोनवेळा फायनलमध्ये पोहचला होता.

२०१० आणि २०२३ मध्ये फायनल गाठली होती. मात्र, त्याला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. अखेर ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद मिळवत रोहन बोपन्ना ओपन एरामध्ये पुरूष दुहेरीत रँकिंगमध्ये अव्वल असणारा आणि ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला. ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपन्ना आणि मॅथ्यूज एब्डन यांचा मुकाबला सिमोने आणि अँड्रिया या इटालियन जोडीशी होता. पहिल्या सेटमध्ये रोहन बोपन्ना आणि एब्डन यांनी चांगली सुरुवात केली. मात्र, इटालियन जोडीने त्यांना कडवी टक्कर देत सेट टाय ब्रेकरवर नेला. अखेर टाय ब्रेकरवर गेलेला सेट बोपन्ना आणि एब्डन यांनी ७-६ (७-०) असा जिंकला.

त्यानंतर दुस-या सेटमध्येही इटालियन जोडीने दमदार खेळ करत पहिले दोन गेम जिंकले होते. त्यांनी २-० अशी आघाडी घेतली. मात्र अनुभवी बोपन्ना आणि एब्डनने ३-३ अशी बरोबरी करत दुसरा सेट देखील चुरशीचा केला. मात्र, चौथा गेम सिमोने आणि अँड्रिया यांनी जिंकत पुन्हा आघाडी घेतली. मात्र पिछाडी भरून काढत बोपन्ना आणि एब्डनने दुस-या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी केली. त्यानंतर दुसरा सेट बोपन्ना आणि एब्डन यांनी ७-५ असा जिंकत इतिहास रचला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR