25.9 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeराष्ट्रीयहिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक

हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक

जम्मू काश्मीर : उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाने हंदवाडा येथून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी बंदी घातलेल्या हिजबुल मुजाहिदीन संघटनेशी संबंधित असून तो परिसरात सॉफ्ट टार्गेट करण्याची योजना आखत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने आज हंदवाडा येथील कचारी गावातून हिजबुल मुजाहिद्दीन (एचएम) दहशतवाद्याला अटक केली. त्याला टार्गेट किलिंग करण्याचे काम सोपवण्यात आले होते.

दरम्यान, हंदवाडा येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना, एसएसपी हंदवारा दाऊद अयुब म्हणाले की विशिष्ट माहितीवर कारवाई करून, लष्कराच्या ३० आरआर आणि हंदवाडा पोलिसांसह सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करून दहशतवाद्याला अटक केली आहे. झाकीर हमीद मीर असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून, या भागात दहशतवादी हल्ला करून निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्याची जबाबदारी त्याला देऊण्यात आली होती. तो पाकिस्तानस्थित हँडलर जहूर अहमद मीरच्या संपर्कात होता,असा दावाही एसएसपी अयुब यांनी केला.

दहशतवाद्यांकडून एक चिनी पिस्तूल आणि एक हँडग्रेनेड जप्त करण्यात आले .त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असे ही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR