ताडकळस : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी अंतर्गत नवोपक्रम स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. विजेत्या शिक्षक स्पर्धकांना जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या कार्यक्रमात परभणी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, शिक्षणाधिकारी प्रा. गणेश शिंदे, प्राचार्य डाएट डॉ.विकास सलगर, शिक्षणाधिकारी योजना संजय ससाणे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
शिक्षकांच्या नवोपक्रमशिलतेला, सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी यांच्यामार्फत नुकत्याच जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या निकालानुसार प्राथमिक गटातून छाया पाटील-मानवत (प्रथम), संतोष रत्नपारखे-पूर्णा (द्वितीय), नरेंद्र कांबळे-मानवत (तृतीय), दीपाली महिंद्रकर-परभणी (चतुर्थ), संजीवकुमार सूर्यवंशी (पंचम), उत्तेजनार्थ मारोती कदम (पूर्णा), अशोक कुंभार (सेलू) तर माध्यमिक गटातून प्रेमेंद भावसार (प्रथम)-पूर्णा यांना जिल्हास्तरावर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
ही स्पर्धा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य डॉ.अनिल मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली होती. सूत्रसंचालन स्पर्धेचे प्रमुख तथा वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रल्हाद खुणे यांनी केले. यशस्वीतेसाठी अधिव्याख्याता अनिल जाधव, नाईकनवरे आदींनी परिश्रम घेतले.