सरकारी अधिका-याच्या घरात घबाड

हैदराबाद : भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान तेलंगणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे मुख्य अभियंता बी. रविंदर यांच्यावर उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी तेलंगणच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करत त्यांच्या विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले.

या कारवाईदरम्यान हाती लागलेल्या घबाडामुळे तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या कागदपत्रांनुसार या मालमत्तेची अधिकृत किंमत ९.२४ कोटी रुपये आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या मालमत्तेची खरी किंमत तब्बल १०० कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एसीबीच्या सिटी रेंज-१ पथकाने मंगळवारी बी. रविंदर यांचे घर, कार्यालय आणि त्यांच्याशी संबंधित इतर ९ ठिकाणांवर ही शोधमोहीम राबवली. तपास यंत्रणेने रविंदर यांच्या नातेवाईकांसह त्यांचे निकटवर्तीय आणि गुंतवणूकदारांच्या मालमत्तांवरही गदा आणली आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर जंगम आणि स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

यामध्ये हैदराबाद परिसरातील कोंडाकल व किस्मतपूर येथील ५ मोकळे भूखंड, नरसिंगी आणि नानकरामगुडा येथील ४ आलिशान फ्लॅट्स, शमशाबाद परिसरातील ४ एकर शेतजमीन, मोकिला येथील एक सेमी-फिनिश्ड व्हिला आणि कोंडापूर भागातील एका व्यावसायिक इमारतीचा समावेश आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news