सोलापूर : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरूवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले. या विमानात २३० प्रवाशांसह १२ क्रु मेंबर्स प्रवास करत होते. या दुघटनेत सर्व प्रवाशांसह अन्य लोकांचा मृत्यू झाला. यात सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सांगोला तालुक्यातील हातीद गावातील दोघांचा समावेश आहे.
महादेव तुकाराम पवार व आशाबेन महादेव पवार अशी त्या पती-पत्नींची नावे आहेत. विमान सेवा कंपन्यांनी विमानातून प्रवास करणा-यांची यादी प्रसिध्द केली आहे, त्यात १८५ व १८६ नंबरला महादेव व आशाबेन यांचे नाव आहे. या दोघांना दोन मुले आहेत. एक मुलगा लंडनमध्ये असून दुसरा मुलगा गुजरातमध्ये चालक म्हणून काम करतोय.
गुरूवारी दुपारी महेश पवार हे नातेवाईक विमानतळावर महादेव व आशाबेन यांना सोडायला गेला होता. सोडून बाहेर आल्यावर विमान अपघाताची माहिती कळाली आणि त्याने कुटुंबियांना माहिती दिली. पवार कुटुंबिय हे नडद जि. खेडा, राज्य – गुजरात येथे राहण्यास आहेत. सोलापूरच्या इंद्रधनुमध्ये राहणारे कुटुंब दुर्घटनेच्या परिसरात राहण्यास आहेत, त्यांनीही घडलेल्या घटनेनंतरची परिस्थितीची माहिती दिली.