25.3 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeक्रीडाहैदराबादचा दमदार विजय

हैदराबादचा दमदार विजय

हेनरिक क्लासनेच्या वादळी शतक कोलकात्याचा ११० धावांनी पराभव

दिल्ली : आयपीएल २०२५ च्या ६८ व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबाद संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा ११० धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २७८ धावांचा मोठा धावसंख्या उभारला. प्रत्युत्तरात केकेआर संघ फक्त १६८ धावा करू शकला. यासह, सनरायझर्स हैदराबाद संघाने आपल्या हंगामाचा शेवट विजयाने केला, तर केकेआर संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

आयपीएल २०२५ च्या ६८ व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेनने शतक झळकावून इतिहास रचला. क्लासेनने ३७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यासह तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकणा-या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा संयुक्त तिसरा खेळाडू ठरला आहे. हेनरिक क्लासेनने १९ व्या षटकात आपले शतक पूर्ण केले. क्लासेनने ३७ चेंडूत शतक पूर्ण केले.

वैभव अरोराच्या चेंडूवर दुहेरी धाव घेऊन त्याने हे यश मिळवले. क्लासेनने ३७ चेंडूत शतक ठोकून युसूफ पठाणची बरोबरी केली आहे. युसूफ पठाणने २०१० मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ही कामगिरी केली होती. सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. २०१३ मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने ३० चेंडूत शतक झळकावले. त्यानंतर, यंदाच्याच हंगामात वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत शतक झळकावून अनेक महान खेळाडूंना मागे टाकले. तो सर्वात कमी चेंडूत शतक करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे. त्यानंतर आज हेनरिक क्लासेनने ३७ चेंडूत शतक ठोकून ही कामगिरी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR