28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकोर्टाचे प्रश्न चुटकीसरशी सोडायला मी जादूगार नाही

कोर्टाचे प्रश्न चुटकीसरशी सोडायला मी जादूगार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील किंवा देशभरातील न्यायालयांचे सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवणारा मी जादूगार नाही, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले. सीजेआय म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी न्यायालयातील जुन्या समस्या सोडविण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू केली. एका मुलाखतीत त्यांनी ज्या दिवशी मी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली, त्या दिवशी मी न्यायालयाच्या सदस्यांना, बारला आणि अगदी याचिकाकर्त्यांना मी जादूगार नाही, असे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कारकिर्दीला १ वर्ष पूर्ण झाले, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या मुलाखतीत न्यायालयीन प्रश्नांवर आपले परखड मत मांडले. न्यायालयांवर परिणाम करणा-या दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची माझी योजना होती. म्हणून मी सर्वप्रथम माझ्या खंडपीठातील सहका-यांचा सल्ला घेतला. न्यायपालिकेवर परिणाम करणा-या समस्यांचे निराकरण करण्यासाठी न्यायिक अधिकारी, अभ्यासक आणि संशोधकांची एक टीम तयार केली.

न्यायालयीन पायाभूत सुविधा सुधारणे, केवळ न्यायाधीशांच्याच नव्हे तर न्यायालयीन कर्मचा-यांच्या क्षमता वाढवणे आणि न्यायालयातील खटले प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी करणे हे घटक महत्त्वाचे होते. गेल्या वर्षभरात सर्वोच्च न्यायालय आणि न्यायपालिकेच्या कामकाजात बरीच प्रगती झाली आहे. एका वर्षात सुमारे ५०,००० प्रकरणे निकाली काढली आहेत. शासकीय स्तरावर सुधारणा आणताना आम्ही सर्वोच्च न्यायालयात आयसीटी सक्षम न्यायालये स्थापन केली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR