28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमी दुसऱ्या दिवसापासून शरद पवारांच्या सोबत : अमोल कोल्हे

मी दुसऱ्या दिवसापासून शरद पवारांच्या सोबत : अमोल कोल्हे

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सुनील तटकरे यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी केली होती. सुळेंच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार गटासोबत असल्याचा दावा केला होता. यानंतर कोल्हेनी आपली भूमिका बदलली का, अशी चर्चा सुरु होती. आता यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी दुसऱ्या दिवसापासून शरद पवारांच्या सोबत आहे, भूमिका बदलली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मी शरद पवार साहेबांसोबत असल्याचे जाहीर केले आहे. आज ही मी त्यांच्यासोबत आहे. निवडणूक आयोगाला लिहलेल्या प्रतिज्ञापत्रातही मी पवार साहेबांसोबत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे यावर अधिकच भाष्य करण्याची गरज मला तरी वाटत नाही. मी भूमिका बदलली नाही, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी अमोल कोल्हे हे आपल्यासोबत असल्याचा दावा केला होता. तशा आशयाचे प्रतिज्ञापत्रक अजित पवारांना कोल्हे यांनी दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR