माढा : प्रतिनिधी
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गद्दारांना असे पाडा की यासंबंधीचा संदेश महाराष्ट्रभर गेला पाहिजे. तुम्ही इतरांचा नाद करा, पण माझा नाद करायचा नाही, अशा शब्दांत अजित पवार गटाला इशारा दिला.
मतदानाला अवघे २ दिवस बाकी असताना प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात
गद्दारांना इशारा दिला. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा झटका बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मला देखील ईडीची नोटीस आली होती. मी राज्य सरकारी बँकेचे पैसे काढल्याचे सांगण्यात आले होते. पण मी राज्य सहकारी बँकेचा सभासदही नव्हतो, तरी मला नोटीस आली. मी ईडीच्या कार्यालयाच्या जवळ गेलो त्यानंतर अधिकारी आणि पोलिस प्रशासन म्हणाले. आमची चूक झाली. त्यांनी मला हात जोडल्याचे शरद पवार म्हणाले.
माझ्या खासदारकीची निधीसुद्धा माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांना विश्वासावर खर्च करायचे अधिकार दिले होते. पण राज्यात सरकार बदलले, आपला पक्ष फुटला. त्यावेळी हा माढ्याचा गडी कुठे गेला कळलाच नाही, असे म्हणत गैर कारभार केल्यावर भीती वाटते. ४० वर्षे मी तुम्हाला मदत केली. सीना-माढा सिंचन योजनेसला निधी दिला. तुमच्या कारखान्याला मी मदत केल्याचे शरद पवार म्हणाले.
राज्यातील शेतक-यांबाबत सरकारला आस्था नाही
दोन वर्षात महाराष्ट्रात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झाले. म्हणजेच दर तासाला पाच महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्यात ६४ हजार महिला आणि लेकी बेपत्ता आहेत. शिंदे-फडणवीस या राज्यकर्त्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही, असेही पवार म्हणाले. तसेच राज्यात ६२ लाख तरुण बेरोजगार आहेत. हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मोदींनी उद्योगपतींचे १६ हजार कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतक-यांचे पाच ते दहा हजारांचे कर्ज माफ केले नाही. या सरकारला शेतक-यांबाबत आस्था नसल्याचे शरद पवार म्हणाले.