18.7 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeमनोरंजन मी फक्त तिलाच निवडेन..;  विवेक ओबेरॉयकडून प्रेमाची कबुली

 मी फक्त तिलाच निवडेन..;  विवेक ओबेरॉयकडून प्रेमाची कबुली

 मुंबई : वृत्तसंस्था
 अभिनेता विवेक ओबेरॉयचे खासगी आयुष्य जणू खुल्या किताबासारखंच आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि त्याच्या अफेअरच्या चर्चा जगजाहीर होत्या. जेवढी त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा झाली, त्याहून अधिक त्यांच्या ब्रेकअपची झाली.
  आता दोघेही आपापल्या आयुष्यात खुश आहेत. ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केले. तर विवेकने प्रियांका अल्वाशी लग्नगाठ बांधली. विवेक आणि प्रियांकाचं हे अरेंज मॅरेज होते. तरीही एकाच भेटीत विवेकने तिच्याशीच लग्न करायचे निश्चित केले होते. या दोघांच्या लग्नाला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक त्याच्या पत्नी आणि वैवाहिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.
  विवेक म्हणाला, ‘मी गेल्या १४ वर्षांपासून माझ्या पत्नीवर वेड्यासारखा प्रेम करतोय. आजही जेव्हा ती मेकअप करते, तेव्हा मी तिची प्रशंसा करतो. मी प्रेमात आधी खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत. पण त्याहीपेक्षा छोट्या-छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे मला प्रियंकामुळे समजले. मी तिला फ्लॉरेन्समध्ये अत्यंत ग्रँड पद्धतीने प्रपोज केले होते. मात्र हे तुम्ही प्रत्येक वेळी करू शकत नाही. अशा वेळी छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपनंतर विवेक प्रियंकाला भेटला होता. त्यावेळी त्याची कोणाशीच लग्न करण्याची इच्छा नव्हती. मला या मुलीला भेटायचं नाही इथपासून ते मी तिच्याशिवाय जगू शकत नाही इथपर्यंतचा हा माझा प्रवास आहे. तिला पाहताच मला समजलं होतं की तिच्यासोबतच मला माझं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे.
 माझ्या मते लग्न म्हणजे एक टीम म्हणून एकमेकांचा विचार करून वागणं आणि काम करणं. या नात्यात विश्वास, प्रेम, आदर टिकला पाहिजे. कारण जरी तुम्ही एकमेकांसोबत रोज राहत असलात तरी तुम्ही पार्टनरला गृहीत धरू शकत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा अनादर नाही केला पाहिजे. लग्नसंस्थेतून खूप काही शिकायला मिळतं, अशा शब्दांत विवेक व्यक्त झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR