32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeराष्ट्रीयमंडीतून कन्फर्म मीच जिंकणार

मंडीतून कन्फर्म मीच जिंकणार

मंडी : देशात लोकसभा निवडणुकांसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान हिमाचल प्रदेशमध्ये सुरू आहे. हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी मंडी येथे मतदान सुरू आहे. लोकांनी सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे.

हिमाचलमधून प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत उभी आहे. मंडीमधून भाजपकडून कंगनाला तिकिट देण्यात आले आहे. कंगनाने देखील मतदानाचा हक्क बजावला. कंगना नेहमीप्रमाणे तिच्या कूल अंदाजात मतदान केंद्रावर पोहोचली. तिने मतदानाचा हक्क बजावला. कंगनासोबत तिचे कुटुंबीयही होते. यावेळी कंगना खूप आनंदी दिसत होती.

मतदान केंद्रावरून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना कंगना म्हणाली, लोकशाहीच्या या उत्सवात लोकांनी उत्साहाने सहभागी व्हावे. हा उत्सव आहे, किती लोकांचे रक्त सांडले कुणास ठाऊक तेव्हा जाऊन हा अधिकार मिळाला आहे. संपूर्ण हिमाचलमध्ये मोदी लाट आहे. मोदींनी २०० हून अधिक सभा घेतल्या. त्यांचे कार्य जनतेसाठी हमी आहे. आम्ही मोदीजींची सेना आहोत. भाजप यावेळी ४०० चा आकडा पार करेल. हिमाचलमधील चारही जागा जिंकेल. मंडीतून मी नक्कीच जिंकेन.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR