28.7 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeराष्ट्रीयपाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा

पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा

युद्धाची धमकी देणा-या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. सिंधूचे पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानात दुष्काळसदृष्य परिस्तिती उद्भवली आहे. त्यामुळेच पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) प्रमुख आणि माजी पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी सातत्याने बारताला युद्धाच्या पोकळ धमक्या देत आहे. आता या धमक्यांना भारताने चोख उत्तर दिले आहे.

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या पाच प्रमुख निर्णयांपैकी पाकिस्तानला सर्वात जास्त रडवणारा निर्णय म्हणजे सिंधू पाणी करार रद्द करणे. पाकिस्तान या निर्णयावर इतका संतापला आहे की, वारंवार धमक्या देत आहे. बिलावल भुट्टो झरदारी याच्याकडे धमक्या देण्याचे काम दिले असून, ते सतत सिंधूचा मुद्दा उपस्थित करतात आणि भारताला युद्धाची धमकी देत ​​राहतात. आता पुन्हा एकदा त्यांनी धमकी दिली की जर सिंधूचे पाणी थांबवले, तर आम्ही सर्व सहा नद्या ताब्यात घेऊ.

भारताचे प्रत्युत्तर
बिलावल भुट्टोच्या धमक्यांवर जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी एका ओळीत म्हटले की, पाणी कुठेही जाणार नाही, जे काही बोलायचे आहे ते बोलत राहा. भुट्टो जे बोलतात, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना राजकारण करायचे असेल, तर ते करत राहावे. पाणी वाहिले नाही, तर रक्त वाहेल, अशी धमकीही त्यांनी दिली होती. अशा धमक्यांना आपण घाबरत नाही असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील स्पष्टपणे सांगितले होते की, सिंधू पाणी करार कधीही पूर्ववत होणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR