मुंबई : पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. अमेरिका आणि चीनची मोठी नाचक्की झाली. भारताने आज पाकिस्तानची अमेरिकेने दहशतवादाविरोधात लढण्यासाठी दिलेली दोन एफ १६ लढाऊ विमाने पाडली. एवढेच नाही तर चिनी बनावटीची दोन लढाऊ विमाने देखील पाडण्यात आली.
सर्वांत मोठी अपडेट म्हणजे पाकिस्तानचे टेहळणी विमान, कमांड सेंटरही त्यात असलेले एडब्ल्यूएसीएस विमान पाडण्यात आले आहे. लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या लाहोरकडे कूच करत पाकिस्तानातील अनेक मोठ्या शहरात हल्ले केले. भारत पाकिस्तान तणाव वाढला असताना महाराष्ट्रातही अलर्ट देण्यात आला असून पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या.
याच दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
भारताने पाकिस्तानचे तीन फायटर जेट्स पाडली ही केवळ झलक आहे पाकिस्तानला केव्हा ट्रेलर दाखवण्यात आला आहे जर पाकिस्तान जास्त हुशारी करायला गेला तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल भारतीय जवानांनी कोणत्याही नागरिकांवर हल्ला केलेला नाही केवळ दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले आहेत हा पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला आहे.
पाकिस्तानने भारताविरोधात आणखी काही करायचा प्रयत्न केला तर ते त्यांना महागात पडेल, असा सज्जड दम एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानला भरला. उद्या राज्यातील महत्त्वाच्या नेतेमंडळींची सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठक होणार आहे. त्यावेळी इतर बाबींच्या दृष्टीनेही चर्चा केली जाईल असेही शिंदे यांनी सांगितले.
पाकिस्तानने औकातीत राहावे
पाकिस्तानची भारतावर हल्ला करण्याची औकात नाही पाकिस्तानकडून ज्या कुरापती चालू आहेत त्या मूर्खपणाच्या आहेत पाकिस्तानला सध्या खाण्यासाठीही पैसे नाहीत, अशा परिस्थितीत पाकिस्तानने भारतावर हल्ला चढवला तर भारत आणि भारताचे सैनिक पाकिस्तानचा नाव नकाशावरून मिटवून टाकतील पाकिस्तानने आपल्या औकातीत राहायला हवे आणि मगच इतर गोष्टी कराव्यात असे एकनाथ शिंदे म्हणाले.