27 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रतटकरे यांचे तात्काळ निलंबन करा; सुळेंचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

तटकरे यांचे तात्काळ निलंबन करा; सुळेंचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. खासदार सुनील तटकरे यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी अशी पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहीले आहे. अजित पवार यांच्या गटासोबत गेलेले खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी ४ जुलै ला याचिका दाखल केली होती, मात्र त्यावर कुठलीही करावी केली नाही. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची घेण्याची विनंती सुळे यांनी केली आहे. घटना आणि लोकशाही तत्वे टिकवून ठेवण्यासाठी वेळीच यावर निकाल दिला पाहिजे असे पत्रात म्हटले आहे. एकीकडे राज्यात आमदार अपात्र प्रकारांचा विषय विधानसभा आद्यक्षांच्या समोर सुरू असताना खासदार अपात्रतेप्रकरणी सुळेंनी पत्र लिहीले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR