22.6 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील अस्थिरतेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार

महाराष्ट्रातील अस्थिरतेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार

खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मुंबई : महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचे हे अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केले. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणावर कोणतेही विधेयक अधिवेशनात आले तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, २६/११ भारतातील नव्हे तर जग काळा दिवस म्हणून बघते. या योद्ध्यांनी आपल्या कुटुंबाची काळजी न करता देशासाठी योगदान दिले. २६/११ जग कधीच विसरणार नाही.

माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो
अंतरवाली सराटीमधील दगडफेकीतील संशयित आरोपी ऋषिकेश बेदरेला अटक करण्यात आल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी फोटो ट्वीट करत शरद पवार गटावर टीका केली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नितेश राणेंनी केलेला आरोप मी पाहिलेला नाही, त्यामुळे मी यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहेत, याचा अर्थ आम्ही सगळ्यांना ओळखतोच असे नाही, असेही त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, एखाद्या आमदार आणि खासदारावर हल्ला होत असेल तर त्याचे अपयश गृह विभागाचे आहे.

नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे
मी फडणवीस यांचा राजीनामा मागते ते वैयक्तिक कारणासाठी नाही, भाजपच्या खासदारावर दगडफेक झाली यात अपयश फडणवीस यांचे नाही, पण नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, ते सरकारचे अपयश आहे.
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, माझ्यासमोर बेरोजगारी आणि इतर समस्या भीषण असून मी त्यासाठी लढत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण खराब होत असेल तर त्यासाठी सरकार जबाबदार आहे. सगळ्यात मोठे आव्हान भीषण दुष्काळ आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकार यावरून इतरांचे लक्ष दूर करत आहे.

भाजप आता जुमला पार्टी
दुष्काळ, महागाई, बेरोजगारी या भीषण समस्या आहेत. दूध महाग झालं आहे, कांदा प्रश्न बिकट झाला आहे, शेतक-यांना टॅक्स भरावा लागत आहे. दिल्ली सरकार आता भ्रष्ट जुमला भाजप सरकार आहे. वाजपेयी, सुषमा स्वराज यांची ओरिजिनल सुसंस्कृत भाजप आता जुमला पार्टी झाला असल्याची कडवट टीका त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR