आखातात प्रचंड तणाव

वॉशिंग्टन : आखातातील तणाव अत्यंत शिगेला पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या हल्ल्याची तयारीही पूर्ण झाली असून फक्त निर्णय घेणे बाकी असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

आम्ही इराणवर एका महाकाय हल्ल्याचा विचार करत आहोत. हा हल्ला आजवरच्या कोणत्याही हल्ल्यापेक्षा मोठा असेल. मी या निर्णयाच्या अतिशय जवळ पोहोचलो असून आमची सर्व तयारी पूर्ण झाली आहे असा इशारा ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला. ट्रम्प यांच्या आवाहनावर इस्रायलदेखील या लष्करी कारवाईत सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येमनमधील हुती बंडखोरांनी लाल समुद्रात सौदी अरेबियाच्या दोन तेलाच्या टँकर्सवर केलेल्या हल्ल्यांनंतर परिस्थिती अधिक बिघडली आहे. हुती हे इराणचे प्रॉक्सी असल्याने या हल्ल्यांची संपूर्ण जबाबदारी इराणचीच असेल. इराणला अद्याप त्यांच्या कृत्याची पुरेशी शिक्षा मिळालेली नाही आणि वाटाघाटींच्या टेबलावर आणण्यासाठी त्यांच्यावर लष्करी दबाव वाढवणे आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर इराणही आक्रमक झाला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले. अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवले तर, याची आणखी मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच युद्ध संपवण्याचा मार्ग चर्चा असून हल्ले नाहीत असेही ते म्हणाले.

चर्चा ठप्प
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे, तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेची अरेरावी आणि अवाजवी मागण्यांमुळेच शांतता चर्चा ठप्प झाल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या थेट धमकीमुळे आखातात युद्ध भडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news