नवी दिल्ली : भारत सरकारने पाकिस्तानसोबत होणा-या आयात-निर्यातीस पूर्णपणे बंद केले आहे. या आदेशानंतर आता कोणतीही वस्तू पाकिस्तानला जाणार नाही आणि पाकिस्तानातून येणारही नाही. वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, आता पाकिस्तानातून आयात-निर्यात पूर्णपणे प्रतिबंधित केली आहे.
भारताने आधी थेट व्यापार थांबवला होता आणि आता अप्रत्यक्ष व्यापारही थांबवला आहे. पाकिस्तानला हा भारताकडून मिळालेला मोठा दणका आहे. वाणिज्य मंत्रालय आता त्या वस्तूंची यादी बनवत आहे, ज्या आता पाकिस्तानातून आयात-निर्यात नाही केल्या जाणार.
वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचना जारी करून याबाबत माहिती दिली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. या आदेशानंतर, पाकिस्तानमधून येणा-या सर्व उत्पादनांच्या आयातीवर पूर्ण बंदी असले, मग ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे तिस-या देशातून आयात केली जात असो. भारत सरकारने लादलेले हे निर्बंध परराष्ट्र व्यापार धोरण-२०२३ मध्ये नवीन तरतुदी म्हणून जोडले गेले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताने दहशतवाद संपवण्यासाठी कंबर कसली आहे. शिवाय, पाकिस्तानाविरोधातही विविध कठोर निर्णय घेतले जात आहेत. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांसह पाकिस्तानला, कल्पनाही केली नसेल असे प्रत्त्युत्तर दिले जाईल असा इशारा दिलेला आहे.
त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही प्रत्येक दहशतवाद्यास मारले जाईल, कुणालाही सोडले जाणार नाही, असा सूचक इशारा दिला आहे. एकूण भारताने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे दहशतवाद्यासोबतच पाकिस्तानलाही चांगलीच धडकी भरलेली आहे.