नांदेड :
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज कोंढा, ता. अर्धापूर, जि. नांदेड येथे अशोक चव्हाण यांच्या विरोधात नारेबाजी झाली. हा प्रकार राजकीय आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काम करत आहोत, पुढेही करत राहू.
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की या विषयावर राजकारण करायचे नाही. मात्र, वैयक्तिक स्वार्थापोटी काही मोजके लोक गैरसमज निर्माण करून समाजाची दिशाभूल करत आहेत. हा मराठा आरक्षणाची चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा मंडळींना लोक सुद्धा चांगलेच ओळखून आहेत.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गावात आलेल्या अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी प्रचंड विरोध केला. तसेच चव्हाण यांना गावात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. आंदोलकांचा रोष पाहता अशोकचव्हाण यांनी देखील गावातून काढता पाय घेतला