30.8 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeसोलापूरजोरदार शक्ती प्रदर्शनात प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जोरदार शक्ती प्रदर्शनात प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर : सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या नेत्यांवर टीका करत महाविकास आघाडीच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रणिती शिंदे यांच्या सोबत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित होते. माजी खासदार सुशीलकुमार शिंदे मिरवणूक मार्गाने दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज भरून आल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र भाजपचे मागील दोन्ही माजी खासदार उपलब्ध नव्हते, त्यांना लाज वाटत आहे का? अशी शेलकी टीका प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे, त्यांच्या सोबत त्यांच्या आई उज्ज्वला शिंदे, वडील सुशीलकुमार शिंदे पायी चालत आले होते. वडीलधा-या व्यक्तींचे आशीर्वाद आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी माध्यमांना माहिती देताना प्रणिती शिंदेच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिले.

काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक दाखल झाले होते. काँग्रेस भवनसमोर स्थानिक नेत्यांची भाषणे झाली आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील भाषण करून जिल्हाधिकारी कार्यालयकडे रवाना झाल्या. त्यांच्या सोबत हजारोंच्या संख्येने लोक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दाखल झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शंभर मीटर अंतरावर गर्दी रोखण्याचे आदेश असताना देखील या आदेशाचे तीन तेरा वाजले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR