दावोसमध्ये उद्योगपतींनी गाठला अश्लीलतेचा कळस

दावोस : येथे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमची पाच दिवसीय वार्षिक बैठक शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीत जागतिक उद्योजकांकडून २० लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या गुंतवणुकीसाठी आश्वासन मिळवण्यास भारत यशस्वी झाला आहे. यांत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाच केंद्रीय मंत्री आणि तीन मुख्यमंत्र्यांसह या बैठकीचे भारताच्या वतीने नेतृत्व केले. मात्र, आता या बैठीसंदर्भातील एका वृत्ताने संपूर्ण जगत खळबळ उडवून दिली असून उद्योगपतींच्या सेक्स पार्ट्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे.

डेली मेल डॉट सीओ डॉट यूकेमध्ये प्रसिद्ध् झालेल्या एका वृत्तातून, दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी आलेल्या जगभरातील दिग्गज गुंतवणूकदारांचे काळे सत्य समोर आले आहे. एस्कॉर्ट एजन्सिजने खुलासा केला आहे की, या बैठकीत सेक्स पार्ट्या, वेश्या आणि ट्रान्ससेक्सुअल महिलांची प्रचंड मागणी होती. सोमवारी सुरू झालेल्या या बाठकीसाठी जगभरातील ३,००० हून अधिक उद्योगपती आणि राजकीय नेते उपस्थित होते. टिट४टॅटचे प्रवक्ते अँड्रियास बर्गर यांनी मेलऑनलाइनला दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूईएफच्या सुरुवातीपासूनच, आम्ही दावोस आणि जवळपासच्या प्रदेशात सुमारे ३०० महिला आणि ट्रान्स महिलांना बुक होताना बघितले आहे. याची तुलना २०२४ मध्ये बुक झालेल्या अंदाजे १७० महिलांशी केली जाऊ शकते.

कार्यक्रमांमध्ये एस्कॉर्ट्सची मागणी
लिया मॉडेल्स एस्कॉर्ट एजन्सीच्या जान आणि लिया यांनी म्हटले आहे की, डब्ल्यूईएफसारख्या मोठ्या आयोजनात सर्वसामान्यपणे एस्कॉर्ट्सची मागणी वाढते. कारण जगभरातून अनेक उच्च-श्रेणीतील पाहुणे येत असतात. यामुळे डब्ल्यूईएफसाठी दावोसमध्ये एस्कॉर्ट्सचे येण्याचे मुख्य कारण पैसा कमावणे होते.

३०० पेक्षा अधिक बुकिंग
जगभरातील श्रीमंत लोक येत असतात. जे कोणत्या ना कोणत्या कंपनीचे मालक अथवा सीईओ असतात. काही महिला त्यांच्याकडून प्रति बुकिंग ६,००० डॉलर्स एवढे कमावतात. अनेक एजन्सीज हे मान्य करतात की, ही रक्कम श्रीमंत ग्राहकांसाठी काहीच नाही आणि त्यांचे क्लायंट महिलांच्या काही तासांच्या कंपनीसाठी एवढे पैसे सहज मोजतात. टिट४टॅट बर्गरने म्हटले आहे की, डब्ल्यूईएफमध्ये सरासरी बुकिंग कालावधी चार तासांचा आहे. जो सरासरी प्रतितास दर आणि डब्ल्यूईएफच्या पहिल्या तीन दिवसांदरम्यान टिट४टॅट वर ३०० बुकिंगसह एकत्रितपणे सुमारे सीएचएफ ३००,००० (२७०,०००) एवढा होता.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news