बेंगळुरु : भारतात अधूनमधून पाकिस्तान समर्थक समोर येत असतात. क्रिकेट सामन्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा अनेक वेळा दिल्या गेल्या आहेत. परंतु आता सर्वात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. ज्या विधिमंडळात कायदे केले जातात, त्या परिसरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या आहेत. कर्नाटक विधानसभा परिसरात हा प्रकार घडला.
२७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार सैयद नसीर हुसैन यांच्या विजयानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर तो व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला. व्हिडिओ सत्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली.
२७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुकीचा निकाल आला. कर्नाटकात त्या निवडणुकीत काँग्रेस नेते सैयद नसीर हुसैन विजयी झाले. त्यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. यासंदर्भात व्हिडिओ समोर आला. त्यानंतर काँग्रेसने हा दावा फेटाळला. काँग्रेसकडून कार्यकर्ते सैयद नसीर हुसैन यांच्या विजयाच्या घोषणा दिल्याचा उत्तर दिले गेले. व्हिडिओमध्ये बदल केल्याचा दावा काँग्रेसने केला. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस समोरासमोर आले. हा व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आला. त्यात व्हिडिओत कोणताही बदल केला गेला नाही, व्हिडिओ सत्य असल्याचा अहवाल आला.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुनावर (बेंगळूरु), मोहम्मद शफी (ब्यादगी, जिल्हा हावेरी) आणि इल्ताज (दिल्ली) या तिघांना अटक केली. या प्रकरणात पोलिसांना आठ जणांच्या आवाजाचे नमुने घेतले होते. ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यानंतर ज्या लोकांचे आवाज सारखे आले त्यांना अटक करण्यात आली.