36.8 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeअंतरराष्ट्रीय‘मिस युनिव्हर्स’मध्ये प्रथमच सौदीची सुंदरी!

‘मिस युनिव्हर्स’मध्ये प्रथमच सौदीची सुंदरी!

रियाध : सौदी अरेबियाची प्रतिमा कायम रूढीवादी, परंपराप्रिय अशीच होती, पण गेल्या काही वर्षांत या देशाने अक्षरश: कात टाकली आहे आणि त्यांच्या दृष्टीने अतिशय प्रागतिक निर्णय घेण्याचा झपाटा त्यांनी लावला आहे. अर्थातच आपल्या देशाला कोणीही ‘मागास’ म्हणू नये आणि विकसित देशांच्या किमान मांडीला मांडी लावून तरी बसता येईल, या दृष्टीने सौदीचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांचा प्रयत्न आहे.

महिलांच्या दृष्टीने तर सौदीने अलीकडे खूपच प्रागतिक असे निर्णय घेतले आहेत. महिलांना मोठ्या प्रमाणात सूट, सवलती आणि मुख्य म्हणजे ‘महिला’ म्हणून ज्या अनेक गोष्टी आजपर्यंत त्यांच्या देशांत अमान्य होत्या, त्यातल्या अनेक गोष्टींना आता त्यांनी परवानगी दिली आहे. गेली कित्येक वर्षे तर महिलांना साधा कार चालवण्याचाही हक्क नव्हता. पण तो हक्क त्यांना अलीकडच्या काही वर्षांत मिळाला आहे. त्याशिवाय ट्रेन चालवणा-या, विमान चालवणा-या महिला आता सौदी अरेबियात दिसायला लागल्या आहेत. इतकेच काय सौदी अरेबियातील महिलांसाठी आता अंतराळात जाण्यासाठीही मज्जाव नाही.

या पार्श्वभूमीवर एका घटनेने सगळ्या जगाचे लक्ष सौदी अरेबियाकडे वेधून घेतले आहे. सौदी अरेबियाची सौंदर्यवती आता चक्क ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेतही भाग घेणार आहे. याआधी या स्पर्धेत भाग घेण्याची सौदीच्या सौंदर्यवतींना परवानगी नव्हती. रुमी अल-कहतानी या सुंदरीच्या रूपाने सौदी अरेबिया पहिल्यांदाच या स्पर्धेत आता दिसेल! रुमी स्वत:च या बातमीने अतिशय उत्साहित झाली असून देशातील नागरिकांनी, इतकेच काय परदेशी नागरिकांनीही याबाबत सौदी अरेबियाचे अभिनंदन करताना रुमीला शुभेच्छा दिल्या आहेत. २७ वर्षीय रुमी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील रहिवासी असून पेशाने ती मॉडेल असून सोशल मीडिया एन्फ्लूएन्सर आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे १० लाखांपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. या वर्षीच्या अखेरीस मेक्सिको येथे होणा-या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत रुमी आपल्या देशाची अधिकृत प्रतिनिधी असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR