23.9 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत काही दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत

मुंबईत काही दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढत

मुंबई : विशेष प्रतिनिधी
मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत यंदा पाहायला मिळणार आहे. मुंबईतील काही जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, तर काही ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध मनसे अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी २५ जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार घोषित केले आहेत. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक उमेदवार लढवणार असल्याचे सांगितले होते. मनसेने मुंबईतील २५ जागांवर उमेदवारांची घोषणा केली. यामुळे महायुतीत अस्वस्थता पाहायला मिळत आहे. मनसेने मुंबईतील विधानसभेच्या ३६ पैकी २५ जागांवर निवडणूक लढवत असल्याने या सर्व जागांवर मनसे विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. या २५ जागांपैकी भाजप १७ जागांवर तर शिवसेना शिंदे गट १६ जागांवर निवडणूक लढवत आहे.

यंदा माहीम आणि वरळी विधानसभा मतदारसंघ हे मुंबई विधानसभा निवडणुकीत हाय-व्होल्टेज मतदारसंघांपैकी एक असणार आहेत. कारण माहीम आणि वरळी विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात मनसे, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात लढत होणार आहे. मनसेने माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरेंना उमेदवारी दिली. त्याविरुद्ध ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि शिंदे गटाकडून सदा सरवणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर वरळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR