22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयराजस्थानमध्ये १९९ पैकी १६९ आमदार करोडपती

राजस्थानमध्ये १९९ पैकी १६९ आमदार करोडपती

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर झाले. यासोबतच आता नवे सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर ) एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात राज्यातील सर्व १९९ विजयी उमेदवारांच्या आर्थिक, गुन्हेगारी आणि इतर तपशीलांचे विश्लेषण केले गेले आहे. या अहवालानुसार, राजस्थानमध्ये १९९ पैकी १६९ आमदार करोडपती आहेत. तसेच यावेळी महिला आमदारांच्या संख्येत घट झाली आहे.

निवडणुकीतील १९९ विजयी उमेदवारांपैकी केवळ २० (१० टक्के) विजयी उमेदवार महिला आहेत. तथापि, २०१८ मध्ये, १९९ आमदारांपैकी २३ (१२ टक्के) महिला होत्या. २०२३ मध्ये विजयी झालेल्या १९९ उमेदवारांपैकी ६१ (३१ टक्के) उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्याच वेळी, २०१८ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीदरम्यान, १९९ पैकी 46 (२३ टक्के) आमदारांनी स्वत: विरुद्ध गुन्हेगारी खटले घोषित केले होते. गंभीर गुन्हेगारी प्रकरणांबद्दल बोलायचे तर, यावेळी ४४ (२२ टक्के) विजयी उमेदवारांनी स्वतःविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याचे घोषित केले आहे.

५२ विजयी उमेदवार ५वी ते १२वी उत्तीर्ण
एडीआरने राजस्थानच्या नव्या विधानसभेच्या चेहऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा डेटाही दिला आहे. ५२ (२६ टक्के) विजयी उमेदवारांनी त्यांची पात्रता ५वी पास आणि १२वी उत्तीर्ण असल्याचे घोषित केले आहे, तर १३७ (६९ टक्के) विजयी उमेदवारांनी पदवी आणि त्याहून अधिक शैक्षणिक पात्रता असल्याचे घोषित केले आहे. सहा विजयी उमेदवार डिप्लोमाधारक आहेत आणि चार विजयी उमेदवार केवळ साक्षर आहेत.

१ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती
पक्षनिहाय करोडपती उमेदवारांची आकडेवारी पाहिल्यास भाजपकडे सर्वाधिक ११५ पैकी १०१ (८८ टक्के) करोडपती विजयी उमेदवार आहेत. यानंतर काँग्रेसच्या ६९ पैकी ५८ (८४ टक्के) उमेदवार, बसपच्या दोनपैकी एक आणि आठ अपक्ष उमेदवारांपैकी सात उमेदवारांनी १ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR