33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार

शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार

पिंपरी : लोकशाही निवडणुकीमध्ये प्रत्येकाला उमेदवार देण्याचा हक्क असतो. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत देखील विरोधकांचा उमेदवार असणार आहे. मात्र, तिथे महायुतीचाच उमेदवार विजयी होणार आहे.सध्या देशात मोदींच्या नेतृत्वावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि ते तिस-यांदा पुन्हा पंतप्रधान होतील असा दावा अजित पवार यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, भविष्यात नियोजित केलेली विकास कामे जर आज कर्ज काढून कमी पैशात होत असतील तर ते करायला हरकत नाही. राज्य सरकारनेदेखील समृद्धी महामार्ग कर्ज काढून तयार केला आणि आज त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे देखील कर्ज काढून तयार झाला आणि त्याला बनवायला लागले त्याच्या कित्येक पटींनी पैसे रिटर्न्स स्वरूपात मिळाले आहेत. मात्र, हे मिळालेले पैसे आम्ही दुसरे रस्ते बांधण्यासाठी खर्च करत आहोत.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका जर कर्ज घेत असेल तर ते नियमाला धरून असायला हवे. कर्जाचा ताण महापालिकेवर यायला नको. त्यासंबंधी नगर विकास खाते आणि तिथले अधिकारी योग्य ती काळजी घेतील, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

टीडीआरची किंमत काही वाढणार नाही
टीडीआर घोटाळ्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या टीडीआर घोटाळ्यात बरीच अनियमितता होती. त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या घोटाळ्याला स्थगिती दिली होती. टीडीआर घोटाळ्याला स्थगिती दिल्यामुळे त्या प्रकल्पाची किंमत काही वाढणार नाही, असा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR