परभणी / प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनाच्या अनुषंगाने आज मंगळवार, दि.१९ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिरूप मतदान केंद्राचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गावडे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर अभिरूप मतदान केंद्रात निवडणूक विषयक व्हीडीओ, ऑडिओ, रिल्स त्याच बरोबर प्रत्यक्ष मतदार/कार्यालयात येणारे अभ्यागत/कर्मचारी यांना मतदान करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशिक्षीत २ मास्टर ट्रेनर व त्यांचेसोबत ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात आलेली आहे.
ज्याव्दारे मतदार स्वत: मतदान करून त्यांच्या शंका/समस्याचे समाधान संबंधित प्रशिक्षीत मास्टर ट्रेनरमार्फत करून घेवू शकतो. यामुळे येणा-या आगामी काळातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानांची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे. या वेळी जिल्हा निवडणूक अधिकारी गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती कवली मेघना यांनी प्रत्यक्ष मतदान करून पाहिले. जिल्हाधिकारी यांनी १८-१९ या वयोगटातील नव मतदारांनी मतदार नोंदणी करण्याचे तसेच जिल्ह्यातील सर्व मतदारांनी येणा-या आगामी काळातील निवडणूकीमध्ये आपण मतदानांचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, प्र. उपजिल्हाधिकारी रो.ह.यो. जिवराज डापकर, उपविभागीय अधिकारी परभणी दत्तू शेवाळे, उपविभागीय अधिकारी पाथरी शैलेश लाहोटी, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, निवडणूक नायब तहसिलदार सतिश रेड्डी, अव्वल कारकुन दत्ता गिणगिणे, महसूल सहाय्यक आबासाहेब लोखंडे, प्रदिप जोगदंड, तांत्रिक सहाय्यक दिवाकर जगताप, गोंविद बकान, जोंधळे व जोगदंड आदी उपस्थीत होते. यावेळी उपस्थित असलेल्या नागरीकांनी अभिरूप मतदान कार्यक्रमात सहभाग नोंदवून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची माहिती समजावून घेतली.