24.9 C
Latur
Tuesday, July 1, 2025
Homeपरभणीपारदेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनीच्या भाजीपाला शॉपीचे उद्घाटन

पारदेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनीच्या भाजीपाला शॉपीचे उद्घाटन

परभणी : येथील जिंतूर रोडवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कमान शेजारी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर पारदेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनीच्या भाजीपाला शॉपी उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. वनामकृविचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, ज्येष्ठ विधिज्ञ अशोक सोनी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवी हरणे, डॉ. प्रशांत भोसले, प्रगतशील शेतकरी पंडित थोरात, डॉ. संप्रिया राहुल पाटील, चंद्रपूरचे डेप्युटी कलेक्टर संजय पवार, एसबीआयचे प्रबंधक अलम मोहम्मद मकसूद आर्यन पाटील जिल्हा प्रबंधक अनिल गवळी, नित्यानंद काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरू डॉ. मणी यांनी शेतक-यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून शेतक-यांना प्रोत्साहन दिले. यावेळी येत्या वर्षभरात कलेक्टर ऑफिस जवळ भाजीपाला उत्पादक ग्रुपसाठी एक आउटलेट करून देणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी सांगीतले. अन्य मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले.

या शॉपीमुळे दररोज ताजा भाजीपाला, फळे, सेंद्रिय धान्य, दाळी सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ लोणचे, मसाले, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लाकडी तेल घाण्याचे तेल, आत्मा अंतर्गत तयार तयार केलेल्या महिला बचत गटांनी सर्व प्रकारच्या पापड्या, पापड, कुरडई, खारवडी इत्यादी अन्नपदार्थ हे सर्व आपल्याला एका छताखाली आणि घरपोच सुद्धा मिळेल. या संकल्पनेचे विशेष म्हणजे व्हाट्सअपच्या माध्यमातून एक दिवस अगोदर ऑर्डर घेतल्या जातील आणि सकाळी या सर्व ऑर्डर प्रमाणे घरपोच भाजीपाला-फळे व सर्व पदार्थ पाठविले जातील. जे व्हाट्सअपद्वारे ऑर्डर देऊ शकत नाहीत अशा लोकांसाठी दिवसभर शॉपी उघडी राहील. त्या लोकांनी सर्व प्रोडक्टचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले. प्रस्ताविक व सूत्रसंचालन आत्माच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक स्वाती घोडके यांनी केले. आभार रामेश्वर साबळे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR