मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. त्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा टाकल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. तपास संस्थांकडून आज ठाकरे गट निशाण्यावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
राजन विचारे सध्या ठाण्यातील हिरानंदानी परिसरात राहतात. ठाण्यातील अन्य एका घरावर देखील धाड टाकण्यात आली आहे. आज सकाळपासूनच आयकर विभागाकडून कारवाईला सुरूवात झाली.