छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छ. संभाजीनगर परिसरातील शेतक-यांनी यंदा ब-यापैकी झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे. सध्या ही झेंडूची फुले चांगलीच बहरलेली आहेत. दिवाळी सणानिमित्त वेगवेगळी फुले बाजारात विक्रीसाठी येत आहेत. परंतु दिवाळी सणासाठी लागणारी झेंडूंच्या फुलांना बाजाराज अधिक मागणी आहे.
दरम्यान, दिवाळी सणास सुरुवात झाली असून बाजाराज पणत्या, आकाशदिवे व विविध प्रकारच्या मिठाई विक्री व खरेदी सुरू आहे. घराच्या सजावटीसाठी व पुजेसाठी लागणारी फुले विक्रीसाठी बाजारात आली असून झेंडूंच्या फुलांना विशेष महत्तव आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलशेतीला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे या फुलांना चांगला भाव मिळेल, अशी उत्पादक शेतक-यांना अपेक्षा लागली आहे.
नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सणांचे औचित्य साधून व् शेतक-यांनी दोन पैसे अधिक मिळतील, या आशेपोटी जून-जुलै महिन्यात झेंडूच्या रोपांची लागवड केली होती. आता दिवाळीनिमित्त फुलांना मोठी मागणी आहे; परंतु, शेतक-यांना परतीच्या पावसाची भीती वाटत आहे.
दसरा सणाला चांगला दर मिळाला
एकेकाळी भाव नसल्यामुळे उत्पादक शेतक-यांनी फुले फेकून दिली होती. फुले तोडणीचाही खर्च निघत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते; परंतु आता दिवाळी सणानिमित्त फुलांना चांगली मागणी आहे. दसरा सणालाही चांगला दर मिळाला होता.