31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ

केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ

कोच्ची : देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमिवर देशातील इतर राज्यांकडून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. यादरम्यान कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सोमवारी ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजार असलेल्यांनी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. केरळ आणि इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर त्यांनी हा सल्ला दिला आहे.

कर्नाटकातील कोडागु येथे पत्रकारांशी बोलताना आरोग्य मंत्र्यांनी घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आम्ही काल एक बैठक घेतली. जिथे आम्ही काय पावले उचलली पाहिजेत यावर चर्चा करण्यात आली. आम्ही लवकरच एक अ‍ॅडव्हायजरी जारी करू असेही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यांचे वय ६० वर्षांहून अधिक आहे आणि ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि ज्यांना कॉमोरबिडीटी आहे, त्यांनी मास्क घालणे आवश्यक आहे.

तसेच आम्ही सरकारी रुग्णालयांना तयार राहण्यास सांगितले आहे. केरळच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. मंगलोर, चमनाजनगर आणि कोडागु येथे सतर्कता बाळकण्याची आवश्यक आहे. चाचण्यांची संख्या देखील वाढवली जाईल. ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी अनिवार्यपणे चाचण्या कराव्यात असेही त्यांनी सांगितले.

सक्रिय रुग्णसंख्या १८२८ वर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सोमवारी १,८२८ वर पोहोचली आहेत. तर केरळमध्ये एक मृत्यू नोंदवला गेला असून येथे कोरोनाचा सब व्हेरियंज जेएन१ नुकताच आढळला होता. सध्या कोरोना संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या ४.४६ कोटी (४,४४,६९,९३१) झाली आहे. देशातील रिकव्हरी रेट ९८.८१ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. कोरोनामुळे आतापर्यंत ५,३३,३१७ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृत्यूचे प्रमाण १.१९ टक्के आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR