19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार वायकरांच्या अडचणीत वाढ; ईडीने दाखल केली केस

आमदार वायकरांच्या अडचणीत वाढ; ईडीने दाखल केली केस

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आमदार रवींद्र वायकर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केस दाखल केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जोगेश्वरी भागात पालिकेच्या जागेवर एक लक्झरी हॉटेल बांधकाम प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी वायकर यांच्यासह इतर आरोपींना ईडी चौकशीसाठी समन्स पाठवण्याची शक्यता आहे. ईडीने ५०० कोटी रुपयांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांच्याविरोधात ही केस केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत प्रवर्तन प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) दाखल केला आहे.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने रवींद्र्र वायकरशी संबंधित सर्व दस्तऐवज आणि जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हे दस्तऐवज प्राप्त झाले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी मुंबई महापालिकेच्या खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जमिनीवर फाईव्ह स्टार हॉटेल बनवण्याची परवानगी मिळवली होती. याद्वारे त्यांनी मुंबई महापालिकेच्या सहाय्याने ५०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR